योजनेचे नाव


पंडीत दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार

केंद्र पुरस्कर/केंद्र - राज्य पुरस्कृत / राज्य पुरस्कृत


केंद्र पुरस्कृत

योजनेची थोडक्यात माहिती


पंचायती आणि ग्रामसभा यांच्या सामाजिक व आर्थिक संरचनेतील उल्लेखनीय सुधारणांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच गौरव करण्याच्या दृष्टीने पंडीत दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार आणि नानाजी देखमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार देण्यात येतात.
केंद्र शासनाच्या वतीने पंचायत राज संस्थांना त्यांच्या सामाजिक व आर्थिक संरचनेतील उल्लेखनीय सुधारणांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच गौरव करण्यासाठी पंडीत दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार, नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार, ग्रामपंचायत विकास़ आराखडा अभियान (GPDP) व बालकल्याण ग्रामपंचायत पुरस्कार (Child Freindly Grampanchayat Award) देण्यात येतात. या पुरस्कारांची नामांकने ऑनलाईन प्रणालीवर भरून Freeze करून राज्य शासनास पाठविण्यात येतात. त्यानुसार ग्रामपंचायत स्तरावर , Block Level Committee व District Level Committee यांनी प्रस्तावांची छाननी करून उच्चतम गुणवत्तेनुसार पंचायत राज संस्थांचे प्रस्ताव राज्य शासनास ऑनलाईन प्रणालीवर सादर केले जाते. सदर प्रस्ताव राज्य शासनाच्या वतीने पडताळणी करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर समित्या गठित करण्यात येऊन सदर प्रस्तावांची द्विस्तरीय समित्यांमार्फत पडताळणी करून सदरचे प्रस्ताव राज्य शासनाकडे ऑनलाईन नामांकनाकरिता सादर केले जाते. सदर प्रस्ताव राज्य शासनाकडून केंद्र शासनास ऑनलाईन प्रणालीवर पाठवण्यात येतात.

लेखाशीर्ष व वित्तीय तरतूद (वर्ष निहाय)


केंद्र शासनाच्या पंचायतीराज मंत्रालयाकडून संबंधीत पंचायतराज संस्थांच्या खात्यावर पुरस्काराची रक्कम वर्ग करण्यात येते.

योजनेच्या लाभाचे स्वरुप


पंचायत राज संस्थासाठी प्रोत्साहनपर योजना असून पंचायतराज संस्थांना देण्यात येणारी पुरस्काराची रक्कम समुह लाभासाठी देण्यात येते.

योजनेचे निकष


केंद्रशासनामार्फत प्रश्नावली व मार्गदर्शक सुचना (Guidelines) दर वर्षी http://panchayataward.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशीत करण्यात येतात.