योजनेचे नांव
राज्यातील ग्रामीण क्षेत्रात राष्ट्रपुरुष / थोर व्यक्ती तसेच अन्य प्रसिध्द मान्यवर व्यक्ती यांची स्मारके उभारण्याबाबत
केंद्र पुरस्कृत / केंद्र राज्य पुरस्कृत / राज्य पुरस्कृत
राज्य पुरस्कृत
योजनेची थोडक्यात माहिती
राष्ट्रपुरुष / थोर व्यक्तींची कार्य यापासून नागरिकामध्ये प्रेरणा / स्फुर्ती मिळणे
लेखाशीर्ष व वित्तीय तरतूद (वर्ष निहाय)
मागणी क्रमांक-एल-3, 2515-इतर ग्राम विकास कार्यक्रम, 196 जिल्हा परिषदांना / जिल्हास्तरीय पंचायतीना सहाय (00) (06) थोर व्यक्तींची स्मारके उभारण्याकरिता अनुदान (25152486), 31 सहायक अनुदान (योजनांतर्गत)
अ.क्र. | वर्ष | अर्थसंकल्पीय निधी | झालेला खर्च (रुपये लाखात) |
---|---|---|---|
१ | 17-2016 | 2000.00 | 1056.00 |
२ | 18-2017 | 2000.00 | निरंक |
३ | 19-2018 | 2000.00 | 300.00 |
३ | 2019-20 | 2000.00 | 100.00 |
४ | 2020-21 | 2000.00 (पुरवणी मागणी)-624.20 एकूण -2624.20 |
671.05 155.00 एकूण प्राप्त-826.05 |
५ | 22-2021 | 2000.00 |
योजनेच्या लाभाचे स्वरुप
नागरिकांमध्ये सामाजिक, धार्मिक आणि राष्ट्रीय एकात्मिकतेची भावना निर्माण होणे, थोर व्यक्तींच्या स्मृती व त्यांचे विचार जतन करणे.
योजनेचे निकष
1) स्मारक ज्या व्यक्तींच्या नावाने उभारावयाचे आहे त्याबाबत ग्राम विकास विभागामार्फत संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक समिती गठीत येते.
2) तद्नंतर संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून शासन निर्णय क्रमांक स्मारक-2016/प्र.क्र.03/पंरा-9, दि.11.8.2016 नुसार कार्यवाही करण्यात येते
3) स्मारक बांधकाम आराखडायाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे अभिप्राय घेण्यात येतात.
4) सदर अभिप्रायाच्या आधारे पुढील कार्यवाही करण्यात येते.
5) स्मारके उभारण्यासाठी मोठया किंमतीच्या आराखडयांना मान्यतेसाठी मा.मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. सदर समितीच्या मान्यतेनंतर निधीचे वितरण करण्यात येते.
अर्ज कुठे करावा
ग्राम विकास विभाग / मा.राज्यमंत्री/मा.मंत्री (ग्रामविकास)
जिल्हानिहाय उदिृष्टे (भौतिक व आर्थिक)
आतापर्यंत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 15 जिल्हास्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या असून, त्यापैकी 4 स्मारकांना निधी वितरीत करण्यात आलेला आहे.
सांख्यिकीय माहिती-तत्का (भौतिक व साध्य)
4 स्मारके