योजनेचे नांव


प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण

केंद्र पुरस्कृत / केंद्र राज्य पुरस्कृत / राज्य पुरस्कृत


केंद्र पुरस्कृत

योजना कधी सुरु झाली


सन 2016

योजनेची थोडक्यात माहिती


सर्व बेघरांना, कच्चा घरामध्ये राहाणाऱ्या कुंटुंबाना घरे उपलब्ध करुन देणे हा प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण चा उद्येश आहे.
• सामाजिकआर्थिक जात सर्वेक्षण 2011 मधील उपलब्ध माहितीच्या आधारे तयार करणेत आलेल्या प्राधान्य क्रम यादीतील आणि ग्राम सभेने मान्यता दिलेल्या लाभार्थ्यांना PMAY-G चा लाभ देणेत येतो.
• किमान बांधकाम क्षेत्रफळ 25 स्क्वे. मी. आरोग्यदायी स्वयंपाकगृहासह
• साधारण क्षेत्राकरीता प्रति घरकुल रु. 1.20 लक्ष आणि डोंगराळ क्षेत्राकरीता प्रति घरकुल रु. 1.30 लक्ष इतके अर्थसहाय्य
• MGNREGA अंतर्गत साधारण क्षेत्राकरिता 90 अकुशल मनुष्यदिन व डोंगराळ क्षेत्राकरिता 95 अकुशल मनुष्यदिन निर्मिती
• स्वच्छ भारत मिशन (SBM) अंतर्गत रु. 12,000 इतके अर्थसहाय्य
• पेयजल, विदयुतपुरवठा, LPG गॅस कनेक्शन इ. साठी वेगवेगळया योजनांचे अभिसरण
• प्रति घरकुल अर्थसहाय्य केंद्र राज्य गुणोत्तर 60:40
• घरकुल बांधकामाच्या दर्जाकरीता कौशल्यपुर्ण गवंडयांचा अभाव हा एक मुख्य घटक आहे. त्याकरिता गवंडी प्रशिक्षण कार्यक्रम ची अंमलबजावणी करण्यात येते. गवंडयांना रोजगाराचे साधन उपलब्ध होऊ शकते.
• लाभार्थीस घरकुल बांधकाम करणेकामी Housing Design Typology चा पर्याय उपलब्ध करुन दिला जाणार आहे. यामध्ये तेथील स्थानिक भौगोलिक स्थितीचा अभ्यास करुन त्यांना Housing Design Typology पुरविणेत येत आहेत.
• PMAY-G ची अंमलबजावणी व संनियंत्रण हे ई गव्हर्नन्स च्या माध्यमातून आवास सॉफ्ट आणि ॲप दवारे करणेत येत आहे. लाभार्थी निवड ते लाभार्थीस PFMS प्रणालीदवारे निधी वितरण प्रक्रियेसाठी आवास सॉफ्टचा वापर करणेत येणार तर घरकुलाचे अक्षांश - रेखांश, बांधकाम स्थिती दर्शवणारे फोटो उपलब्ध करुन घेणेकामी ' आवास ॲप चा अवलंब केला जातो.
• लाभार्थ्याची इच्छा असलेस 70,000 रु. चे अर्थसहाय्य कर्ज स्वरुपात बँकेमार्फत वितरीत करणेत येते.
• कार्यक्रमाची अंमलबजावणी व संनियंत्रण हे फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमापुरते न ठेवता सामाजिक अंकेक्षण (Social Audit) च्या माध्यमातून, खासदारांच्या अध्यक्षतेखाली घेणत येणाऱ्या ' दिशा कमिटीच्या ' माध्यमातून, राज्याकडून, राष्ट्रीय पातळीवरुन प्रत्यक्षपणे करणेत येणार आहे.
• 60% उद्दिष्ट SC/ST संवर्गास, 15% उद्दिष्ट अल्पसंख्यांक संवर्गास व उर्वरीत उदिदष्ट इतर संवर्गास देणेत येते. यामध्ये 5% उद्दिष्ट हे अपंग संवर्गास देणेत येते.

लेखाशीर्ष व वित्तीय तरतूद (वर्ष निहाय)


वर्ष उद्दिष्ट उद्दिष्टानुसार आवश्यक निधी (रु. लाखात)
केंद्र हिस्सा
60%
राज्य समरुप हिस्सा
40%
एकूण
2016-17 2,30,422 1,74,074.41 1,16,049.61 2,90,124.02
2017-18 1,50,934 1,14,583.13 76,388.75 1,90,971.88
2018-19 68,464 51,954.74 34,636.49 86,591.23
2019-20 3,54,501 2,63,144.05 1,75,429.37 4,38,573.42
2020-21 3,09,654 2,31,562.91 1,54,375.27 3,85,938.18
एकूण 11,13,975 8,35,319.24 5,56,879.49 13,92,198.73

योजनेच्या लाभाचे स्वरुप


वैयक्तीक लाभाची योजना

योजनेचे निकष


सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण 2011 मधील उपलब्ध माहितीच्या आधारे प्राधान्यक्रम यादी ( GPL) तयार करणेत आलेली आहे. सदर यादीमधून पात्र लाभार्थ्यांची निवड ग्रामसभेमध्ये करावयाची आहे. ग्रामसभेने मान्यता दिलेल्या लाभार्थ्यांची जिल्हास्तरीय समितीमार्फत मान्यता घेऊन अंतिम प्रतिक्षा यादी ( PERMANENT WAIT LIST ) त्या जिल्हयाकरीता करावयाची आहे. जिल्हयास प्राप्त होणा-या उदिदष्टाच्यानुसार संवर्गनिहाय लाभार्थी निवड करावयाची आहे.
सदर प्रक्रियेमध्ये ज्या SECC -2011 चा आधार घेणेत आलेला आहे. त्या सर्व्हेक्षणामध्ये संबंधीत व्यक्तीने त्याच्या कुटुंबाची जी माहिती दिलेली आहे. तीच माहिती अंतिम ग्राहय धरणेत आलेली आहे. त्याच माहितीचे आधारास INCLUSION चे 5 निकष लावुन आणि EXLUSION चे 13 निकष लावून समावेशाची व वगळणेची प्रक्रिया अवलंबणेत आलेली आहे. त्यातून प्राधान्यक्रम यादी (PWL) तयार करणेत आली आहे.

लाभार्थ्याची पात्रता


सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण सन 2011 मधून उपलब्ध झालेली सर्वसाधारण प्राधान्यक्रम यादी (Generated Priority List) ग्रामसभेपुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थीची निवड करणेत येते. या याद्या केंद्रशासनामार्फत तयार करण्यात आलेल्या AwaasSoft या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ही प्राधान्य क्रम यादी, बेघर, एक कच्चा खोली लाभार्थी, दोन कच्चा खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केलेली आहे.
प्राधान्यक्रम यादीमधील व्यक्तींची ग्रामसभेद्वारे निवड करण्यात येते.

जिल्हा निहाय उद्दष्टये (भौतिक व आर्थिक)


प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण
सन 2016-17 ते 2020-21 जिल्हा निहाय उद्दष्टये (भौतिक व आर्थिक)

क्रमांकजिल्हा भौतिक उद्दिष्टये(PWL) भौतिक साध्यआर्थिक उद्दिष्ट (रू. लाखात)वित्तीय साध्य(रू. लाखात)
1 AHMEDNAGAR 47861 28810 57433.2 38950.20
2 AKOLA 44561 24726 53473.2 35259.80
3 AMRAVATI91477 45208 109772.4 62666.00
4 AURANGABAD 22136 14609 26563.2 19181.95
5 BEED 19699 10856 23638.8 14018.05
6 BHANDARA 56099 28167 72928.7 46399.55
7 BULDHANA 28310 15750 33972 22231.75
8 CHANDRAPUR 31986 19601 41581.8 29744.10
9 DHULE 46601 35967 55921.2 46527.35
10 GADCHIROLI 23050 14647 29965 22152.85
11 GONDIA 82384 66022 107099.2 85808.50
12 HINGOLI 10128 7436 12153.6 8855.00
13 JALGAON 66096 34990 79315.2 45136.00
14 JALNA 13336 7655 16003.2 9635.85
15 KOLHAPUR 14462 9860 17354.4 12051.70
16 LATUR 10968 6908 13161.6 8563.00
17 NAGPUR 39532 20173 47438.4 27630.25
18 NANDED 49172 22173 59006.4 30954.20
19 NANDURBAR 105746 71240 126895.2 97101.40
20 NASHIK 70412 53184 84494.4 70631.80
21 OSMANABAD 6048 3892 7257.6 4686.95
22 PALGHAR 25689 23029 30826.8 28243.45
23 PARBHANI 7141 4746 8569.2 6021.30
24 PUNE 18943 10053 22731.6 13117.00
25 RAIGAD 7846 6818 9415.2 8080.75
26 RATNAGIRI 6098 5014 7317.6 6342.55
27 SANGLI 18650 9690 22380 12139.20
28 SATARA 13471 7591 16165.2 9964.65
29 SINDHUDURG 3994 3008 4792.8 3835.55
30 SOLAPUR 44712 21756 53654.4 29390.05
31 THANE 6734 6161 8080.8 7459.80
32 WARDHA 16192 9230 19430.4 13115.30
33 WASHIM 10787 5695 12944.4 7584.55
34 YAVATMAL 39897 23046 47876.4 32654.10
Total11002186777111339614916134.50