योजनेचे नाव
महालक्ष्मी सरस प्रदर्शन व विभाग / जिल्हास्तरीय प्रदर्शने
केंद्र पुरस्कर/केंद्र - राज्य पुरस्कृत / राज्य पुरस्कृत
केंद्र-राज्य पुरस्कृत
योजना कधी सुरू झाली
डिसेंबर , 2003
योजनेची थोडक्यात माहिती
• महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्थापित करण्यात आलेल्या बचत गटांनी /वैयक्तिक महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी स्वरोजगारी लाभार्थ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतुने केंद्र शासन व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य स्तरावर मुंबई येथे सन 2003 पासून सरस प्रदर्शनआयोजित करण्यात येते.
• महालक्ष्मी सरस प्रदर्शना करीता रू. 40 लक्ष इतकी केंद्र शासनाकडून व रू. 50.00 लक्ष इतकी राज्य शासनाकडून तरतूद दर वर्षी करण्यात येते.
• राज्य स्तरावरील महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता गटांनी तयार केलेल्या वस्तू, उत्पादने, साहित्य, नाविन्यपूर्ण कला व खाद्यपदार्थ सहजपणे शहरी नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येतात.
• महालक्ष्मी सरसच्या धर्तीवर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे जीवनमान ऊंचवावे व त्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे याकरीता तसेच दारिद्र्य रेषेखालील महिला स्वयंसहाय्यता गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिनांक 27.02.2009 च्या शासन निर्णयान्वये विभाग व जिल्हा स्तरावरील विक्री प्रदर्शने आयोजित करणे हीयोजनाराबविण्यात येत आहे.
• विभाग स्तरावरील विक्री प्रदर्शने आयोजित करण्याकरीता प्रत्येकी रू. 25.00 लक्ष व जिल्हास्तरावर दरवर्षी विक्री प्रदर्शने आयोजित करणेकरीता प्रत्येकी रू. 10.00 लक्ष निधी वितरीत करण्यात येतो.
• गतवर्षी महालक्ष्मी सरस प्रदर्शनामध्ये एकूण 511 स्टॉलच्या माध्यमातून 26 राज्यातील व महाराष्ट्रातील एकूण 1100 महिला बचत गटाचे प्रतिनिधी / स्वयंरोजगारी सहभागी झाले होते. त्यांनी प्रदर्शन कालावधी दरम्यान रू. 12 कोटी इतक्या किंमतीच्या वस्तूची विक्री केली.
लेखाशीर्ष व वित्तीय तरतूद (वर्ष निहाय)
मागणी क्रमांक एल-3, 2501- ग्रामीण विकासासाठी विशेष कार्यक्रम, 101- स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना (01) (04) प्रदर्शने व कायमस्वरुपी विक्री केंद्रे बांधणे (2501 1993) 31- अर्थसहाय्य
योजनेच्या लाभाचे स्वरुप
वैयक्तिक / समूह लाभाची योजना - महिलांसाठी
अर्ज कुठे करावा
1) महालक्ष्मी सरस , मुंबई करीता अर्ज करावयाचे ठिकाण- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान, बेलापूर नवी मुंबई
2) जिल्हा स्तरीय विक्री प्रदर्शना करीता करावयाचा अर्ज- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
जिल्हानिहाय उद्दिष्टे ( भौतिक व अर्थिक)
प्रत्येक जिल्हास्तर , विभाग स्तर व राज्य स्तरावर प्रदर्शन आयोजन
भौतिक | आर्थिक | |
---|---|---|
राज्यस्तर | 1 प्रदर्शन | 50 लक्ष |
जिल्हास्तर | जिल्हानिहाय 1 प्रदर्शन | 10 लक्ष |
विभागस्तर | विभागनिहाय 1 प्रदर्शन | 25 लक्ष |
सांख्यिकीय माहिती - तक्ता ( भौतिक साध्य)
जिल्हा , विभाग निहाय संख्या
जिल्हा व विभाग यांचे वर्षानिहाय | भौतिक | साध्य |
---|---|---|
2016-2017 | 33 | 33 |
2017-2018 | 41 | 41 |
2018-2019 | 39 | 39 |
2019-2020 | 41 | 41 |
2020-2021 | कोविड-19 च्या प्रार्दुभावामुळे प्रदर्शने रद्द करण्यात आले. |
सांख्यिकीय माहिती - तक्ता ( वित्तीय साध्य)
राज्यस्तर, विभागस्तर, जिल्हा निहाय वित्तीय माहिती.
जिल्हा व विभाग यांचे वर्षानिहाय | वित्तीय तरतूद | उपलब्ध करुन दिलेला निधी |
---|---|---|
2016-2017 | 540 लक्ष | 490 लक्ष |
2017-2018 | 540 लक्ष | 540 लक्ष |
2018-2019 | 540 लक्ष | 540 लक्ष |
2019-2020 | 540 लक्ष | 480 लक्ष |
2020-2021 | कोविड-19 च्या प्रार्दुभावामुळे प्रदर्शने रद्द करण्यात आले. |