योजनेचे नाव
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना
केंद्र पुरस्कृत/केंद्र-राज्य पुरस्कृत/राज्य पुरस्कृत
राज्य पुरस्कृत
योजना कधी सुरू झाली
ग्राम विकास विभागाच्या दिनांक २८ ऑक्टोबर, २०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सुरू करण्यात आलेली आहे. View
मुख्यमंत्री ग्राम सड़क (राज्य पुरस्कृत योजना)
ग्राम विकास विभागाच्या दिनांक २८ ऑक्टोबर, २०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सुरू करण्यात आलेली आहे.
योजना बंद होण्याचा दिनांक/वर्ष
सन 2015-16 ते 2019-20 या 5 वर्षाच्या कालावधीसाठी
योजनेची थोडक्यात माहिती
राज्यातील सर्वसाधारण क्षेत्रातील 500 पेक्षा जास्त (आदिवासी क्षेत्रातील 250 पेक्षा जास्त) लोकसंख्या असलेल्या न जोडलेल्या उर्वरित वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी नवीन जोडणी व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत अंतर्भुत न झालेल्या अस्तित्वातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांची दर्जोन्नती करणे यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरू करण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्ते दर्जोन्नतीचे 30,000 कि.मी. व नवीन जोडणीचे 730 कि.मी. चे उद्दीष्ट ठरविण्यात आलेले होते.
लेखाशीर्ष व वित्तीय तरतूद (वर्ष निहाय)
अ.क्र. | आर्थिक वर्ष | लेखाशीर्ष शेरा | अर्थसंकल्पीय तरतूद(रु. कोटित) |
---|---|---|---|
१ | 2019-20 | 5054 5153 | 1894.50 |
२ | 2020-21 | 5054 5153 | 1500.81 |
३ | 2021-22 | 5054 5153 | 1500.00 |
सांख्यिकीय माहिती- तक्ता (भौतिक साध्य)
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सन 2015-16 ते 2019-20 या 5 वर्षाच्या कालावधीत आत्तापर्यंत एकुण 30373 कि.मी. लांबीच्या, रु.18800.68 कोटी किंमतीच्या 7753 रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मंजूरी दिलेली असून रस्ता मंजूरीचे उद्दीष्ट पुर्ण झाले आहे. सदर मंजूर कामांपैकी सद्यस्थितीत एकुण 16751 कि.मी. लांबीची 3040 कामे पुर्ण झाली आहेत. तसेच उर्वरीत 10370 कि.मी. लांबीची कामे प्रगतीपथावर व 3252 कि.मी. लांबीची कामे निविदा स्तरावर / तांत्रिक मान्यता स्तरावर आहे.
सांख्यिकीय माहिती- तक्ता (वित्तीय साध्य)
मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत दिनांक ३१ मार्च, २०२१ पर्यंत विविध स्त्रोतांतर्गत ग्राम विकास विभागास एकुण रू.१२४१७.५७ कोटी इतका निधी प्राप्त झाला असून सदर निधी खर्च करण्यात आला आहे.