योजनेचे नाव
केंद्रीय स्वामित्व योजना
केंद्र पुरस्कर/केंद्र - राज्य पुरस्कृत / राज्य पुरस्कृत
केंद्र पुरुस्कृत
योजना कधी सुरू झाली
मार्च २०२०
योजना कालावधी
२ वर्ष
योजनेची थोडक्यात माहिती
१.ग्रामीण भारतातील नागरिकांना कर्जे आणि इतर वित्तीय लाभ घेता यावेत याकरिता त्यांच्या मालमत्तेचा एक वित्तीय मत्ता म्हणून वापर करणे त्यांना शक्य व्हावे म्हणून वित्तीय स्थिरता आणणे.
२.ग्रामीण नियोजनाकरिता अचूक भूमी अभिलेख निर्माण करणे.
३.मालमत्ता कराचे निर्धारण करणे.
४.सर्वेक्षण विषयक पायाभूत सुविधा आणि भौगोलिक माहिती प्रणाली नकाशे निर्माण करणे,ज्यांचा कोणत्याही विभागास आपल्या कामाकरिता वापर करता येईल.
५.भौगोलिक माहिती प्रणाली नकाशांचा वापर करून,उत्तम दर्जाचा ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यात सहकार्य करणे.
६.मालमत्ता सबंधित विवाद व कायदेशीर प्रकरणे कमी करणे.
लेखाशीर्ष व वित्तीय तरतूद (वर्ष निहाय)
लेखाशीर्ष-२५१५ २५७५
वित्तीय तरतूद २०१८-१९ २.०० कोटी
२०१९-२० ४२.६८ कोटी
२०२०-२१ १९.०० कोटी
योजनेच्या लाभाचे स्वरुप
सर्व मिळकत धारक