योजनेचे नांव


आर.आर.(आबा) पाटील सुंदर गांव पुरस्कार योजना

केंद्र पुरस्कृत / केंद्र राज्य पुरस्कृत / राज्य पुरस्कृत


राज्य पुरस्कृत योजना

योजना कधी सुरु झाली


शा.नि.क्र.स्माग्रायो-2015/प्र.क्र.151-अ/योजना-1, दि.21.11.2016 व दि.20.3.2020 View

योजनेची थोडक्यात माहिती


राज्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीस शासनाच्या विविध योजनेची अंमलबजावणी करुन आदर्श गांव असा नाव लौकिक मिळविणे

लेखाशीर्ष व वित्तीय तरतूद (वर्ष निहाय)


मागणी क्रमांक-एल-3 2515, इतर ग्रामविकास कार्यक्रम, 198, ग्रामपंचायतींना सहाय (00) (01) आर.आर.(आबा) पाटील सुंदर गांव पुरस्कार योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पंचायत राज संस्थांना सहायक अनुदाने 2515 1677 31, सहायक अनुदाने (वेतनेतर)

अ.क्र.अर्थसंकल्पीय निधीसुधारित अंदापत्रकानुसार प्राप्त निधी (रुपये लाखात)वितरित निधी (रुपये लाखात)
17-2016 (पुरक मागणी) 200.00 160.00 160.00
18-2017 5380.00 4304.00 4304.00
19-2018 5380.00 4304.00 4304.00
2019-20 8890.00 37.23 37.23
2020-21 5500.00 2750.00 2750.00
2021-22 5500.00

योजनेच्या लाभाचे स्वरुप


गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्याकरिता स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपारिक ऊर्जा व पर्यावरण आणि पारदर्शकता व तंत्रज्ञान इत्यादीबाबीची अंमलबजावणी करुन समृध्‍द व संपन्न गावांची निर्मिती होईल. सदर योजनेतर्गंत दरवर्षी तालुका स्तर व जिल्हा स्तर सुंदर गांव ग्रामपंचायतीची निवड करण्यात येते व निवडलेल्या ग्रामपंचायतींना रु.10.00 व रु.40.00 इतक्या रक्कमेचे पारितोषिक दिले जाते.

योजनेचे निकष


शासन निर्णय, दि.21.11.2016 मधील तरतुदीन्वये सुंदर गांव निवडीसाठी निकष व गुणांकन निश्चित करण्यात आले आहेत.

लाभार्थिची पात्रता


तालुका सुंदर गांव व जिल्हा सुंदर गांव निवड करतांना सर्वाधिक गुण प्राप्त ग्राम पंचायतींची पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.

अर्जाचा नमुना


शा.नि.क्र.स्माग्रायो-2015/प्र.क्र.151-अ/योजना-1, दि.21.11.2016 सोबतचे परिशिष्ट-अ नुसार, ग्राम पंचायतीनी स्वमुल्यांकन करुन त्यांचे प्रस्ताव संबंधित पंचायत समिती कार्यालयास सादर करावेत.

अर्ज कुठे करावा


(1) गट विकास अधिकारी, पंचायत समिती,
(2) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

जिल्हा निहाय उदिृष्टे (भौतिक व आर्थिक)


385 (351 प्रथम तालुकास्तर व 34 व्दितीय जिल्हा स्तर पुरस्कार)